वीज समस्यांबाबत शेकाप आक्रमक

Team RatnagiriLive
2 Min Read
  • महावितरणवर शेकापचा मोर्चा निघणार !
  • तक्रारदारांनो तक्रारी घेऊन या ; नागरिकांना विकास नाईक यांचे आवाहन.

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण एमएसईबी केंद्रावर ९ जुलैला शेकाप उरणने मोर्चा जाहीर केला असून मोठ्या तयारीने न्याय मिळविणारा मोर्चा काढणार, असा आक्रमक पवित्रा शेकाप उरणचे चिटणीस विकास नाईक आणि शेकापच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतला असून एमएसईबीने
चर्चेसाठी बोलावले असता आपले मत आक्रमक पणे मांडून ९ जुलैला मोर्चा काढणारच असे आक्रमक मत व्यक्त केले.

वाढीव बिले देताना,किंवा ग्राहकांवर कारवाई करताना, गावात रात्रीबेरात्री येऊन गावातील कुणाही साक्षीदारास
न घेता ग्राहकांना गुन्हेगार ठरवून बेहिशोबी दंड करणे हे चुकीचे असून उरणची जनता शोषित बनून आर्थिक त्रास सहन करत आहे.कधीही लाईट जाणे, ती अनिश्चित वेळी येणे, दररोजचा त्रास झाला आहे. कमर्सियल आणि घरगुती वीज वापर आणि कमर्शियल वापरात असलेला मोठा भ्रष्टाचार, अधिका-यांच्या इच्छेनुसार मिटर बदल, गावागावांमध्ये सरकारी कायम कामगार आणि टेंपरी कामगार कोण हे न समजणे अवघड झाले आहे.

गावात कमर्शियल मीटर देताना पैशांच्या मोठ्या मागणी केली जात आहे .इत्यादी विषयांवर मोठी चर्चा झाली परंतु योग्य आणि निर्णायक उत्तर मिटिंग मध्ये मिळाले नाही.तरी ०९ जुलैला उत्तर घेऊच असे शेकाप कार्यकर्त्यांनी ठरविल्याचे समजले.


चर्चमध्ये उरण तालुका चिटणीस विकास नाईक,शेकाप महिला अध्यक्षा सीमा घरत,नरेश घरत, रमाकांत पाटील,अनंत घरत, महेश म्हात्रे, रायगड भूषण प्रा.एल.बी.सिताराम नाखवा. प्रदीप नाखवा, नारायण पाटील इ. शेकाप कार्यकर्ते आणि एमएस ईबीतर्फे पनवेल कार्यालयाचे आसीम सरोदे,उरणचे उपकार्यकारी अभियंता विनय सोनावले, शिंदे,मोकल आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment