ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामनाथ गायकवाड यांचे दुःखद निधन

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि. ३ (विठ्ठल ममताबादे ) : भारताच्या स्वातंत्र्य लढयात स्वातंत्र्य सैनिकांना महत्वाचे स्थान होते. ते आजही आहे. देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणा-यांना जनता , देश कधीच विसरत नाही. देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्यांपैकी एक जेष्ठ स्वांत्र्यसैनिक म्हणून सुपरिचित असलेले उरणमधील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रामनाथ सखाराम गायकवाड (वय ९२ वर्षे ) यांचे मंगळवार दि २ जुलै २०२४  रोजी वृध्दापकाळाने त्यांच्या घरी कोटनाका येथे दुःखद निधन झाले.

देशभक्त रामनाथ गायकवाड यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढयात महत्वाचे योगदान राहिले आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य युध्दात सहभाग घेतला. १९५१ च्या गोवा मुक्ती संग्राम मध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक हिरवे गुरुजी यांच्या सानिध्यात त्यांनी जुलमी ब्रिटीश राजवटीला सळो की पळो करून सोडले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी कारावासही भोगला.

उरणमधील हुतात्मा स्मारकांसाठी त्यांनी मोठा लढा दिला.लायन्स क्लबचे ते माजी अध्यक्षही होते. गोर गरिबांना, उपेक्षितांना सामाजिक बांधिलकीतून सढळ हाताने दान करण्यास, त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास ते नेहमी पूढे असायचे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक असलेले रामनाथ सखाराम गायकवाड यांच्या निधनाने संपूर्ण रायगड जिल्हयात, मुंबई, नवी मुंबई परिसरात शोककळा पसर‌ली आहे. 

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment