ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य करणार ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजना

Team RatnagiriLive
1 Min Read

६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी “मुख्यमंत्री वयोश्री” योजनेचा लाभ घ्यावा.

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग.


रत्नागिरी  : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” लागू करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

या योजनेतून ज्येष्ठ नागरिकाना शारीरिक असमर्थतता / + दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने / उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि- ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. करिता एकरकमी रक्कम 3 हजार रुपये प्रति व्यक्ती पात्र बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट वितरण प्रणालीव्दारे लाभार्थीना लाभ मंजूर करण्यात येणार आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment