जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकरला दोन सुवर्णपदके

Team RatnagiriLive
1 Min Read

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड

राजापूर : रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा बाबासाहेब आंबेडकर भवन राजापूर येथे दि. ५ ते ७ जुलै २०२४ रोजी पार पडली. या स्पर्धेत ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. रत्नागिरी मधील एस आर के तायक्वांदो क्लबची खेळाडू स्वरा साक्षी विकास साखळकर हिने या स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवली. फ्री स्टाईल पुमसे प्रकारात तिने एक सुवर्णपदक तर क्युरोगीमध्ये कॅडेट गटात एक सुवर्णपदक मिळविले.

या स्पर्धेसाठी तिला मुख्य प्रशिक्षक शाहरुख सर यांचे मार्गदर्शन लाभले तिने मिळवलेल्या या यशामुळे चंद्रपूर येथे होणाऱ्या टायकोंडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

स्वरा ही रत्नागिरीतील दामले शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment