Konkan Railway | उधना-मंगळुरु विशेष गाडीला जादा डबा जोडणार!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या सुरत जवळील उधना ते मंगळुरु या विशेष गाडीला जादा डबा जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. दीपावली सणानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढल्याने रेल्वेेने विशेष गाड्यांचे नियोजन करण्यासह आधीच्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचे धोरण रेल्वेने स्वीकारले आहे.

या बाबत कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उधना- ते मंगळुरु (09057) तसेच मंगळुरु ते उधना ((09058) या अप -गडाऊन दोन्ही फेर्‍यांना अनुक्रमे 3 व 4 नोव्हेंबरच्या फेर्‍यांसाठी स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा जोडण्यात येणार आहे.

ऐन गर्दीच्या हंगामात रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावरील या गाडीला जादा डबा जोडण्याचा निर्णय घेतल्याने प्रतीक्षा यादीवर तिकिटे असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment