चिपळूणची डॉ. नाझनीन चिकटे हिला कॅनडाच्या विद्यापीठाची पदवीव्युत्तर पदवी

Team RatnagiriLive
1 Min Read

चिपळूण :  तालुक्यातील कळंबस्ते येथील कन्या डॉ. नाझनीन खलील चिकटे हिने कॅनडातील नामांकित विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

दि. १० जून रोजी एका भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये तिला ही पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली. काम कळंबस्ते सारख्या गावातील सुकन्येच्या या शैक्षणिक यशाबद्दल परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

विदेशात उच्च शिक्षण पूर्ण करून मातृभूमीचा गौरव वाढवणाऱ्या डॉ. चिकटे यांचे चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment