ज्येष्ठ गायक संजय मराठे यांचे निधन

Team RatnagiriLive
1 Min Read

ठाणे : संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र गायक व हार्मोनियम ऑर्गन वादक पंडित संजय राम मराठे यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते ६८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात युवा तडफदार गायक भाग्गेश मराठे, प्राजक्ता मराठे, पत्नी, सूना नातवंडे असा परिवार आहे.

संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नुकत्याच झालेल्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर अनेक कार्यक्रमात त्यांचा मुख्य सहभाग होता.

आपले धाकटे बंधू गायक मुकुंद मराठे यांच्यासह त्यांनी ‘संगीत मंदारमाला’ हे संगीत नाटक जन्मशताब्दी वर्षात साकारले होते आणि आज देखील त्याचे प्रयोग जोरदार चालू आहेत. त्यांचे अंत्यविधी सोमवारी १६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जवाहर बाग स्मशानभूमीत होणार आहेत.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment