शोध कलारत्नांचा उपक्रमाला आमदार शेखर निकम यांची भेट

Team RatnagiriLive
2 Min Read
  • विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलाकृतींचे केले कौतुक

संगमेश्वर : रत्नागिरी जिल्हा परिषद आयोजित शोध कलारत्नांचा हा उपक्रम हा सह्याद्री शिक्षण संस्थेचे सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे येथे संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला गेला. या कार्यशाळेला चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

जिल्हा परिषदेने राबविलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.कार्यशाळा दोन टप्प्यात संपन्न झाली . दुस-या टप्प्यातील कार्यशाळेला आमदार शेखर निकम यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाकृती पाहून समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषदेने हा उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागाचे सुद्धा कौतुक केले. सदर प्रशिक्षण निवासी होते.विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी विविध कला जोपासल्या पाहिजेत, जीवनात यशस्वी होण्यासाठी या कलाकृतींचा नक्कीच उपयोग होईल, तसेच कला ही अशी गोष्ट आहे की ती आपल्याला वाईट गोष्टी पासून लांब ठेवते तसेच आपल्या वेळेचा सदुपयोग करण्याचे कौशल्य कलेमुळे प्राप्त होते. ज्या शाळेतील कला शिक्षक उत्तम तेथील विद्यार्थांमधील शिस्त, संस्कार उत्तम असतात .ही कला आपण सातत्याने अंगी जोपासावी,असे मार्गदर्शन आमदार निकम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.तसेच नियोजन आणि व्यवस्थापन पाहणाऱ्या सर्व टीमचे कौतुक केले.

आमदार शेखर निकम यांचे शिक्षण विभाग रत्नागिरी यांच्या वतीने राजअहमद देसाई विस्तार अधिकारी चिपळूण यांनी स्वागत केले.सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट कॉलेजचे प्राचार्य माणिक यादव , सर्व प्राध्यापक अणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे राजअहमद देसाई यांनी सांगितले.

यावेळी सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट कॉलेजचे चेअरमन प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य यादव, व्यवस्थापक सतीश सावर्डेकर, सर्व प्राध्यापक,शिक्षक विद्यार्थी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment