रत्नागिरीत दावत-ए-इफ्तारला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

Team RatnagiriLive
1 Min Read
  • उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरी येथे आयोजन

रत्नागिरी : उदय सामंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दावत-ए-इफ्तार पार्टीला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून संबोधित केले. या कार्यक्रमातून सर्व धर्मीय बांधवांमध्ये बंधुभाव निर्माण करण्याचा उद्देश साध्य झाला असल्याचे यावेळी ना. उदय सामंत म्हणाले.

“जो या देशावर प्रेम करतो, त्याच आम्ही समर्थन करतो,” असे स्पष्ट करत, आम्ही देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्यावर भर देतो. आम्ही ज्या पक्षात काम करतो, त्यांच्या विरोधात फेक नेरेटिव्ह सेट करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी आमचा विश्वास विकासावर व लोकांच्या मन जिंकण्यावर आहे, असेही यावेळी ना. उदय सामंत हयांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही मुस्लिम बांधवांप्रती असलेले प्रेम व राष्ट्र उभारणीसाठीची त्यांची भूमिका स्पष्ट आहे. विकासाची ही वाटचाल व सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू, असा शब्द यावेळी ना.  सामंत यांनी दिला.

हे देखील वाचा : Konkan Railway |  रत्नागिरी ते उरणच्या जेएनपीटी बंदरात कंटेनर मालवाहतूक सेवा

या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, परशुराम कदम, सुदेश मयेकर, अल्ताफ संगमेश्वरी, डॉ. अलिमिया परकार, डॉ. मतीन परकार . डॉ मुनीर म्हसकर. डॉ. वलीद पावसकर, रझाक काझी यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment