अनिरुद्ध उपासना केंद्र आयोजित शिबिरात १५१ जणांचे रक्तदान

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रक्ताअभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसेच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून अनिरुद्ध उपासना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद शाळा, पेन्शन पार्क, उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १९१ रक्तदात्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १५१ रक्तदाते स्वीकारण्यात आले.

रक्तदानाविषयी जनजागृती करत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला उरण तालुक्यातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

उरण तालुक्यातील अनिरुद्ध उपासना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. अनिरुद्ध अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला सद्गुरु ब्लड बँक कोपरखैरणे यांचे महत्वाचे सहकार्य लाभले.

हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी उरण तालुक्यातील सर्व बापू भक्तांनी विशेष मेहनत घेतली.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment