प्रा. आनंद गायकवाड यांना भूगोल विषयात पीएच.डी. प्रदान

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ): कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. आनंद गायकवाड यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा एक नवा शिखर गाठला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्यातर्फे त्यांना भूगोल विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

“जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय बंदराचा उरण तालुक्यातील सामाजिक आणि आर्थिक परिणामाचा भौगोलिक अभ्यास” या विषयावर त्यांनी सखोल आणि अभ्यासपूर्ण संशोधन केले. या संशोधन प्रक्रियेमध्ये त्यांना उप प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रा. गायकवाड यांच्या या उल्लेखनीय यशामध्ये पत्नी सौ संध्या, कन्या निशा, चिरंजीव आर्यन, सर्व कुटुंबीय आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. लोणे व ग्रंथपाल प्रा. एस. यु. धारासुरकर तसेच कार्यालयीन अधीक्षक टी. एन. घ्यार , महाविद्यालय विकास समिती सदस्य, सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी वृंद, मित्र, आप्तेष्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.उरण परिसरातील शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.या शैक्षणिक सन्मानाबद्दल प्रा. गायकवाड यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्यावर पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment