अभ्यागत अधिव्याख्याता पदासाठी २० जुलै रोजी मुलाखती

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी संस्थेत यंत्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरीता तात्पुरत्या स्वरुपात तासिका अधिव्याख्याता पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षाकरिता नियुक्ती करण्यात येणार असून, सदर अध्यापक नियुक्तीच्या अनुषंगाने जे अभ्यागत 12 जुलै 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत अशा उमेदवारांसाठीच फक्त परत एकदा सदर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या पदासाठी शैक्षणिक अर्हता बी. ई. प्रथमश्रेणी असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपला अर्ज, मूळ प्रमाणपत्र, झेरॉक्स प्रतीसह 20 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता विस्तारीत इमारत संबंधित बांधकाम विभाग-यंत्र अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथे उपस्थित रहावे, असे प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी यांनी कळविले आहे.*

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment