दापोलीत पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्या दोन महिला

Team RatnagiriLive
2 Min Read

दापोली : काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आपल्या देशात विविध कारणाने वास्तव्य करणाऱ्या भारत सोडून देण्याचा आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभर सुरू असलेल्या चौकशीत दापोली तालुक्यात दोन पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्या महिला सापडल्या आहेत. चौकशीमध्ये या महिलांनी भारतीय नागरिकत्व असलेल्या पुरुषांशी लग्न केल्याचे आढळून आले आहे. यातील एक महिला शहर इतर दुसरी ग्रामीण भागात वास्तव्यास आहे.

कश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान संदर्भात कठोर पावले उचलली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानातून भारतात येऊन राहणार नागरिकांची चौकशी सुरू आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातही पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्या व्यक्ती राहत असल्याच्या संशयाने कसून चौकशी हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये दापोली तालुक्यात दोन महिला पाकिस्तानी नागरिक असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान या दोन्ही महिलांनी आपल्या विजयाची मुदत वाढवून देण्यासाठी अर्ज केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.


भारत सरकारचा पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. सरकारने पाकिस्तानातील नागरिकांना तातडीने भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. या हल्ल्यात २५ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत.

  • व्हिसा रद्द, सीमा सील
  • भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले आहेत. तसेच, भारत-पाकिस्तान सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील प्रवास आणि व्यापार थांबला आहे.
  • महाराष्ट्रामध्येही अलर्ट
  • महाराष्ट्रामध्येही या पार्श्वभूमीवर विशेष सतर्कता जारी करण्यात आली आहे. राज्यातील पोलीस यंत्रणेला पाकिस्तानी नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • नागरिकांमध्ये नाराजी
  • या निर्णयामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक जे शिक्षणासाठी किंवा इतर कामांसाठी भारतात आले होते, ते अडचणीत आले आहेत. काहींनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
  • पुढील कार्यवाही काय?
  • भारत सरकार पुढील काळात काय पाऊले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी dialogue सुरू होण्याची शक्यता आहे का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment