गरीब रुग्णांना वैद्यकीय मदत माहितीपत्रक ठरणार वरदान!

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई : शिवसेना वैद्यकीय मदत माहिती पत्रकाचे प्रकाशन राजाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. हे वैद्यकीय मदत माहिती गोरगरीब रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या माहिती पत्रकाच्या माध्यमातून एका स्कॅनरवरून महाराष्ट्र शासनाच्या सर्व आरोग्य योजना सहज उपलब्ध होतील, ज्यामुळे गरजूंना योग्य आणि तातडीची वैद्यकीय मदत मिळवणे अधिक सुलभ होईल, असे या माहितीपत्रकाच्या प्रकाशनावेळी ना.  उदय सामंत यांनी सांगितले.
आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मोठा टप्पा असून शिवसेना नेहमीच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहे, असे देखील ना. सामंत म्हणाले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment