Big breaking | कोकण रेल्वेच्या विलीनीकरण प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा यशस्वी

Team RatnagiriLive
1 Min Read
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्र्यांना कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीनीकरणासाठी दिले पत्र 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना लेखी पत्र पाठवून महाराष्ट्र सरकारचे वतीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यात यावे, यासाठी संमती दिली, असल्याची विश्वासनीय माहिती प्राप्त झाली आहे.

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण व्हावे यासाठी कोकण विकास समिती समवेत अनेक रेल्वे संघटनांनी आवाज उठवला होता. कोंकण विकास समितीचे वतीने रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय महापदी यांनी कोंकण रेल्वेची स्थापना, कोंकण रेल्वेचे उत्पन्न आणि कोंकण रेल्वेचे विकासासाठी घ्यावे लागणारे कर्ज तसेच भविष्यातील कोंकण रेल्वेची स्थिती याबाबत अभ्यासपूर्ण लेखजोगा पटवून दिला होता; ज्यामध्ये महाराष्ट्रातील आमदार श्री प्रवीण दरेकर, शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे तत्कालीन खासदार विनायक राऊत, खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार नारायण राणे, खासदार अरविंद सावंत यांनीही हा प्रश्न प्रखरपणे मांडला होता.

कोकण रेल्वेच्या संदर्भातील या महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वांचेच योगदान सार्थकी लागून एक दिवस रेल्वे बोर्ड अधिकृतरित्या कोंकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण झाले असे शिक्कामोर्तब करण्याचा मार्ग मुख्यमंत्र्यांच्या या लेखी पत्रामुळे मोकळा झाला आहे

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment