मुंबईहून कोकणात यायचंय तर तुमच्यासाठी आहे भरपूर कन्फर्म तिकीटे असलेली ही विशेष गाडी!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • मुंबई गोव्यादरम्यान २३ स्थानकांवर घेणार थांबे

रत्नागिरी : मुंबईतून कोकण रेल्वे मार्गे गावी येण्यासाठी तुम्ही जर कन्फर्म तिकीट असलेली ट्रेन  शोधत असाल तर तुमच्यासाठी या विशेष गाडीचा पर्याय उत्तम आहे. १४ जून रोजी मुंबईतून मडगावसाठी सुटणाऱ्या जनशताब्दीच्या धर्तीवरील  विशेष गाडीला शेकडो तिकिटे उपलब्ध आहेत.

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई CSMT ते मडगाव जंक्शन दरम्यान एक विशेष ‘वन वे’ रेल्वे (गाडी क्रमांक ०११७१) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणवासीयांसाठी तसेच गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा देणारी आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment