मुंबईत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Team RatnagiriLive
1 Min Read
  • शिवसेना म्हणजे विश्वास, विकास आणि विजय : डॉ. उदय सामंत

मुंबई:  मुंबई येथे एका भव्य कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात नवप्रवेशितांचे स्वागत राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे संपर्कमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.


यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “शिवसेना म्हणजे विश्वास, विकास आणि विजयी नेतृत्वाचं प्रतीक आहे.” आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही निश्चितच बाजी मारणार आहोत, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सामंत यांच्या या विधानाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले.

पुण्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेला पाठिंबा:
पुण्यातून मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांच्या या पक्षप्रवेशाने शिवसेनेची पुणे जिल्ह्यातील ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला अधिक बळ मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना आणि महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment