साखरप्याजवळ वाहनाची धडक बसून सांबराचा जागीच मृत्यू

Team RatnagiriLive
1 Min Read

देवरुख : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साखरपानजीक करंजरी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री सुमारास 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

(सांबराचे छायाचित्र प्रतिकात्मक )

महामार्गावर पडलेल्या मृत सांबराची माहिती मिळताच वन विभागाने त्वरित हालचाली सुरू केल्या. परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल सागर गोसावी यांच्यासह दाभोळे येथील वनरक्षक सुप्रिया काळे, साखरपाचे सहाय्यक वनरक्षक सहयोग कराडे, फुणगूसचे आकाश कडुकर आणि आरवलीचे सुरज तेली यांनी घटनास्थळी भेट देत मृत सांबराची पाहणी करुन पंचनामा केला.

या अपघातात धडक देणारे वाहन अद्याप अज्ञात असून, संबंधित चालकाचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून आवश्यक कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. वन्यप्राणी संरक्षणाच्या दृष्टीने महामार्गांवर वेगमर्यादा पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment