रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींमुळे ५ लाखांहून अधिक लोक व्यसनमुक्त

Team RatnagiriLive
2 Min Read

नाणीज : जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणा व अमूल्य मार्गदर्शनामुळे आजपर्यंत ५ लाखांहून अधिक लोकांनी व्यसनमुक्तीचा मार्ग स्वीकारला आहे. गेली ३५ वर्षे त्यांचे हे समाजोपयोगी कार्य अखंडपणे सुरू असून, त्याचा व्यापक सकारात्मक परिणाम समाजावर होत आहे.

श्री क्षेत्र नाणीजधाम येथील व्यसनमुक्ती शिबिरात मार्गदर्शन करताना रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

गेल्या काही दशकांत विदेशी संस्कृतीच्या प्रभावामुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः तरुणाई व्यसनांच्या विळख्यात अडकून त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक आयुष्यावर विपरीत परिणाम होत आहे. या गंभीर परिस्थितीची जाणीव होऊन जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी व्यसनमुक्तीचे कार्य हाती घेतले. समाजाला दुर्व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रभावी उपक्रम राबवले असून, त्याचा लाभ हजारो कुटुंबांना झाला आहे. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या मार्गदर्शनामुळे व्यसनाधीन व्यक्तींना नवजीवन मिळत असून, त्यांच्या संसारात पुन्हा आनंद फुलताना दिसत आहे. व्यसनमुक्तीच्या या चळवळीमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत आहेत.


दर महिन्याला श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरांना राज्यभरातून तसेच देशाच्या विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत आणि व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करत आहेत.
दि. ३० मार्च २०२६ रोजी आयोजित व्यसनमुक्ती शिबिरात ६२६ जणांनी सहभाग घेतला. या सर्वांनी व्यसनमुक्त होण्याचा ठाम निर्णय घेतला असून, रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी त्यांना निर्धार कायम ठेवण्याचे आशीर्वाद दिले.
जगद्गुरुश्रींचे हे सेवा कार्य समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारे असून, एक सक्षम, सुदृढ आणि व्यसनमुक्त राष्ट्रनिर्मितीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment