हातखंबा प्रशालेच्या आरती मयेकर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : ५० वे विज्ञान प्रदर्शन शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी व ए. जी. दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने ५० वें रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होतें. या प्रदर्शनात जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये हातखंबा येथील गुरुवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिरमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. आरती गुरुप्रसाद मयेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात देखील सौ. आरती मयेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाली. नुकतेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. सौ मयेकर यांनी प्रयोगशाळा सहाय्यक या गटामध्ये सहभाग घेऊन विज्ञान पेटी हा प्रयोग सादर केला होता. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ही त्यांनी बाजी मारत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यावेळी‎ त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान‎ चिन्ह व प्रमाणपत्र देऊन‎ गौरवण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment