तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र कोषाध्यक्षपदी रत्नागिरीचे व्यंकटेश्वरराव कररा

Team RatnagiriLive
2 Min Read

देवरूख (सुरेश सप्रे) : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या भारतीय महासंघाशी संलग्न असलेली तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) राज्य संघटनेचे कोषाध्यक्षपदी रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा यांची निवड करण्यात आली असून राज्य संघटना अध्यक्षपदी डॉ. अविनाश बारगजे (बीड) तसेच महासचिवपदी मिलिंद पठारे याची बिनविरोध निवड झाली आहे.

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक अँड. राजकुमार कश्यप व निवडणून निर्णय अधिकारी विजय ढाकणे यांच्या उपस्थितीत सन 2023 ते 2027 या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली.


नवी दिल्ली उच्चन्यायालायच्या आदेशनुसार तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या भारतीय महासंघाची निवडणून पार पडल्यानंतर विविध राज्यातील निवडणूक व विविध राज्यातील अधिकृत राज्य संघटनांचा निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत.


तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या निर्देशानुसार तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई या राज्य संघटनेचा कार्यकारी मंडळ ची निवडणूक औरंगाबाद येथे दि. 29 रोजी पार पडली. प्रत्येक पदासाठी प्रथेकी एकच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. त्यानुसार
अध्यक्ष डॉ . अविनाश बारगजे (बीड) उपाध्यक्ष विनायक गायकवाड (मुंबई) धुळीचंद मेश्राम (गोंदिया) वृषाली पाटील जोगदंड (नांदेड) राजेश महाजन (उस्मानाबाद) भालचंद्र कुलकर्णी ( सिंधुदुर्ग), महासचिव मिलिंद पठारे सचिव सुभाष पाटील सहसचिवपदी लेखा चेत्री (यवतमाळ) कौशिक गरवलीया (ठाणे) विनायक येणापुरे (सांगली)
कोषाध्यक्ष व्यंकटेशवरराव कररा, कार्यकारिणी सदस्य नीरज बोरसे (औरंगाबाद) अजित घारगे (जळगाव) सतीश खेमस्कर (चंद्रपूर) शिवछत्रपती पुरस्कार खेळाडू) शिवछत्रपती पुरस्कार राज्य क्रीडा मार्गदर्शक तायक्वांदो पुरस्कार मानकरी प्रवीण बोरसे व सुशांत भोयार यांची निवड करण्यात आली.


या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारीचे राज्य व जिल्हा भरातून अभिनंदन होत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment