मिरजमार्गे धावणारी एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे धावणार

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : नेहमी लोंढा -मिरज मार्गे पुण्याला जाणारी पुणे एर्नाकुलम पुणे ही साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे गाडी दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी कोकण रेल्वे मार्गे धावणार आहे. रेल्वेच्या साऊथ -वेस्टर्न लाईन वर सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे ही गाडी कोकण रेल्वेच्या मार्गाने वळवली जाणार आहे.


गाडी क्रमांक  11098 ही साप्ताहिक एक्सप्रेस एर्नाकुलम ते पुणे मार्गावर लोंढा -मिरज मार्गे मार्गावर धावते. मात्र, दक्षिण पश्चिम रेल्वेने लोंढा आणि मिरज सेक्शन दरम्यान दुपदरीकरणाचे काम हाती घेतल्यामुळे एरणाकुलम पुणे एक्सप्रेसच्या 6 फेब्रुवारी २०२३ रोजी फेरीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. ही गाडी कोकण रेल्वे मार्गाने मडगाव रत्नागिरी, रोहा, पनवेल, कर्जत, लोणावळा अशी स्थानके घेत पुण्याला जाणार आहे.


या बदलामुळे 6 फेब्रुवारी रोजी चहा फेरीसाठी ही गाडी सॅनवोर्देम, कु्लेम, कॅसल रॉक, बेळगाव मिरज सांगली कराड  सातारा हे थांबे घेणार नाही.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment