- तेजस एक्सप्रेस दादर तर मंगळूरु एक्सप्रेस ठाण्यापर्यंतच धावणार
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ च्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने ०६ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे Konkan Railway) मार्गावरून धावणाऱ्या दोन प्रमुख ए(क्स्प्रेस गाड्यांच्या अंतिम थांब्यामध्ये (Short Termination) बदल करण्यात आला आहे.
बदल झालेल्या गाड्यांचे वेळापत्रक व तपशील:
- मडगाव – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस (गाडी क्र. २२१२०): प्रारंभिक स्थानकातून सुटण्याच्या दिनांकानुसार (JCO) ०५ ऑगस्ट २०२६ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान ही गाडी सीएसएमटी ऐवजी दादर (DADAR) स्थानकापर्यंतच धावेल.
- मंगळूरु – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस (गाडी क्र. १२१३४): प्रारंभिक स्थानकातून सुटण्याच्या दिनांकानुसार (JCO) ०५ ऑगस्ट २०२६ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान ही गाडी सीएसएमटी ऐवजी ठाणे (THANE) स्थानकापर्यंतच धावेल.
प्लॅटफॉर्म कामामुळे ट्रेनच्या फेऱ्यांवर झालेल्या या बदलांची नोंद घेऊन कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
