कांदळवन तोडीविरोधात तक्रार करा व्हाट्सअप वर!

Team RatnagiriLive
1 Min Read

अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत तक्रार दाखल करण्यासाठी टोल फ्री व व्हाट्सअप क्र. जाहीर

अलिबाग : जिल्ह्यातील नागरिकांनी कांदळवनाचे संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवनाचा ऱ्हास व तोडीबाबत जिल्हास्तरावर तक्रार दाखल करण्यासाठी तसेच अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्र-1077 व व्हॉटसअप क्र. 8275152363 चा वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.


मा.उच्च न्यायालयाने कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जनहित याचिका 87/2006 मध्ये दि.17 सप्टेंबर 2018 रोजी आदेश पारीत केले होते. त्यानुषंगाने, शासन, महसूल व वन विभागाकडील दि. 16 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयान्वये सागरतटीय जिल्ह्याकरिता कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विभागीय स्तरावर तसेच जिल्हा/तालुका स्तरावर संनियंत्रण समित्या गठीत करण्याबाबत निर्देश दिले होते.


त्यानुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडील दि.03 नोव्हेंबर 2018 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने व या कार्यालयाकडील दि.16 नोव्हेंबर 2018 च्या आदेशान्वये जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.


या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी कांदळवनाचे संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवनाचा ऱ्हास व तोडीबाबत जिल्हास्तरावर तक्रार दाखल करण्यासाठी तसेच अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्र-1077 व व्हॉटसअप क्र. 8275152363 चा वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment