भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण मंडल अध्यक्षापदी प्रियल जोशी

Team RatnagiriLive
2 Min Read

रत्नागिरी : भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण मंडल अध्यक्षपदी सौ. प्रियल प्रशांत जोशी, यांची  नियुक्ती करण्यात आली. भाजपा नेते बाळासाहेब माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी श्री बाळासाहेब माने यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना “संघटना बांधणी” चा कानमंत्र दिला.

जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या बैठकीमध्ये सौ. जोशी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यानंतर पक्ष वाढीसाठी पक्ष संघटनासाठी, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी, महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी यानंतर काम करणार असल्याचे सौ. प्रियल जोशी यांनी सांगितले.


सौ. वर्षा ताई ढेकणे, जिल्हाध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा यांनी पक्षाचा प्रचार प्रसार करण्यासाठी समस्त भाजपा रत्नागिरी तर्फे नवनियुक्त महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौभाग्यवती प्रियल जोशी यांना शुभेच्छा दिल्या. सौ. शिल्पा ताई मराठे प्रदेश सचिव यांच्या सोबत नवनियुक्त मंडळ अध्यक्षा सौ. प्रियल जोशी आणि त्यांच्या महिला कार्यकारीणीची बैठक ही पार पडली. उपस्थित  जिल्हाध्यक्षा, सौ. ऐश्वर्या जठार आणि ओबीसी जिल्हाध्यक्ष, श्री भाई जठार यांनी ही प्रियल जोशी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

या बैठकीस भाजपा रत्नागिरी दक्षिण चे जिल्हाध्यक्ष राजेश दादा सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ताई ढेकणे, प्रदेश सचिव सौ शिल्पा ताई मराठे, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, मंडळ अध्यक्ष शदादा दळी, युवा जिल्हाध्यक्ष हृषिकेश केळकर, ओबीसी जिल्हा अध्यक्ष भाई जठार, माजी जिल्हाध्यक्षा सौ ऐश्वर्या ताई जठार, अनुसूचित जिल्हाध्यक्ष संजय निवळकर, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नीलेश आखाडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment