होळीसाठी सुरू केलेली
रोहा-चिपळूण मेमू स्पेशल ट्रेन उद्यापासून रद्द

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी :  होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रोहा ते चिपळूण मार्गावर सुरु करणार्‍यात आलेल्या मेमू स्पेशल पॅसेंजर ट्रेनच्या फेर्‍या दि. 9 ते 12 मार्च 2023 या कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रोहा – चिपळूण (01597) ही मेमू स्पेशल गाडी दि. 9 ते 12 मार्चसाठी तर चिपळूण- रोहा (01597) ही परतीची मेमू देखील वरील कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे.

शिमगोत्सवासाठी कोकणात येणार्‍या चाकरमान्यांच्या साईसाठी मेमू ट्रेनच्या जादा फेर्‍या रेल्वेकडून जाहीर करण्यात आल्या होत्या.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment