कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या जबलपूर -कोईमतूर सुपरफास्ट एक्सप्रेसला मिळाली मुदतवाढ

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या जबलपूर ते कोईमतूर या साप्ताहिक फेस्टिवल स्पेशल गाडीला ९ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून ही गाडी विशेष गाडी म्हणून चालवली जात आहे.

जबलपूर ते कोईमतुर (02198/02197) अशी आठवड्यातून एकदा धावणारी फेस्टिवल स्पेशल गाडी कोकण रेल्वे मार्गे चालवली जाते. आधी जाहीर केल्याप्रमाणे या गाडीच्या फेऱ्या २ ऑक्टोबर रोजी संपणार होत्या. आता पुन्हा एकदा 9 ऑक्टोबर 2023 पर्यंत ही गाडी वाढवण्यात आली आहे. जबलपूर ते कोईमतुर या मार्गावर ही गाडी शुक्रवारी तर कोईमतुर ते जबलपूरसाठी ती सोमवारी प्रवासाला निघते.

कोकण रेल्वे मार्गावरील गाडीचे थांबे


मध्यप्रदेशातील जबलपूर येथून कोकण रेल्वे मार्गे येण्यासाठी निघालेली ही गाडी भुसावळ नाशिक मार्गे पनवेल स्थानक घेतल्यानंतर रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थी वी, मडगाव हे कोकण रेल्वे मार्गावरील थांबे घेत ती दक्षिणेतील कोईमतूरला जाते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment