ज्येष्ठ नागरिक मंडळाचे गुढीपाडवा निमित्त शोभायात्रेचे आयोजन

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : गुढीपाडवा म्हणजे मराठी वर्षाची सुरवात.उरण मध्ये मराठी नववर्षाचे स्वागत विविध सांस्कृतिक धार्मिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात केले जाते.याही वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिक मंडळ उरण तर्फे सालाबादप्रमाणे याहीवर्षा गुढी पाडवा निमित्त शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही शोभा यात्रा उरण शहरात पेन्शनर्स पार्क येथून गणपती चौक, एन आय हायस्कूल मार्गे परत पेन्शनर्स पार्क या मार्गे काढण्यात येते.विविध सामाजिक संस्था संघटनेचा दरवर्षी शोभा यात्रेत मोठा सहभाग असतो. दिनांक 22 मार्च 2023 रोजी सकाळी 8.30 वा. पेन्शनर्स पार्क, उरण शहर येथून या गुढी पाडवा शोभा यात्रेची सुरवात होणार आहे. तरी जास्तीत नागरिकांनी विविध सामाजिक संस्था संघटनांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष हसमुख भिंडे (पालू भिंडे ), उपाध्यक्ष अरुण मोदी, सचिव उमेश नाईक आदींनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment