राजीवलीच्या सरपंच उपसरपंच यांना लाच घेताना पकडले

Team RatnagiriLive
1 Min Read

संगमेश्वर : लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी संगमेश्वर येथे सापळा लावून राजीवलीतील सरपंच तसेच उपसरपंच यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमध्ये प्रशांत प्रदीप शिर्के, सरपंच, ग्रामपंचायत राजीवली. ता. संगमेश्वर तसेच सचिन रमेश पाटोळे, उपसरपंच, ग्रामपंचायत राजीवली या दोघांना 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. लाचखोरी प्रकरणी सरपंच तसेच सरपंच यांना एकाच वेळी पकडण्यात आल्यामुळे संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे.


यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांचे मित्राचे वतीने या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पाखाडी तयार करण्याचे काम त्यांनी केले होते. तक्रारदार यांनी या पूर्वी केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला व सध्या पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्याचा मोबदला म्हणून इतर लोकसेवक प्रशांत शिर्के, सरपंच, ग्रामपंचायत राजीवली व इतर लोकसेवक सचिन पाटोळे, उपसरपंच ग्रामपंचायत राजीवली, तालुका संगमेश्वर यांनी तक्रारदार यांच्याकडे 40,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 30,000/- रुपये लाचेची मागणी करून मागणी केलेली लाच रक्कमेपैकी 15000/- रू. सरपंच प्रशांत शिर्के यांनी व 15000/- रू. उपसरपंच सचिन पाटोळे यांनी आज रोजी स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

या प्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सरपंच तसेच उपसरपंच यांच्यावर कारवाई करण्याचे लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडून सुरू आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment