रत्नागिरीसाठी अग्निशामक वाहनाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते लोकार्पण

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियानांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अग्निशामक वाहनाचे आज पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण संपन्न झाले.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पूजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.

रत्नागिरी नगर परिषदेला नवीन अग्निशामक वाहन खरेदीसाठी 55 लाख रुपये मंजूर झाले होते. या अनुदानातून रत्नागिरी नगर परिषदेने नवीन अग्निशमन वाहन खरेदी केले आहे. या वाहनाची पाणी साठवणूक क्षमता 5 हजार लिटर असून त्यात फोम वापराचीही सुविधा आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment