मराठा समाजाचे नेते दाजी सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन

Team RatnagiriLive
1 Min Read

वयाच्या ९२ व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास

देवरूख (प्रतिनिधी) : देवरूख दत्तनगरमधील जुन्या काळातील शिक्षक व संगमेश्वर तालुका क्षत्रिय मराठा समाजाचे आधारस्तंभ व माजी सचिव यशवंत तथा दाजी सावंत (गुरूजी) यांचे देवरूखातील घरी वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन

दाजी म्हणूनच परिचित असलेल्या सावंत गुरूजींनी रत्नागिरी-देवरूख – संगमेश्वर आदी ठिकाणी सेवा बजावताना अध्यापनाबरोबरच पारंपरिक शेती. संस्कार. परंपरा याचे शिक्षण देत अनेक विद्यार्थ्यांना घडविले.. ७० व८० च्या दशकातील कडक शिस्तीचे गुरूजी म्हणून ते ओळखले जात.

कै अप्पा जाधव यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांना बरोबर घेत स्थापन केलेल्या संगमेश्वर तालुका क्षत्रिय समाजाचे ते सक्रीय सदस्य होते. देवरूखात मराठा भवनाची वास्तू व्हावी म्हणून त्यांनी आपल्या जुन्या समाज बांधवांबरोबरीने मोठे योगदान दिले.. अनेकवेळा भूमिपूजन होवून हि गेली अनेक वर्षे रखडलेल्या मराठा भवनाचे काम यावर्षीच खऱ्या अर्थाने पुर्णत्वास गेल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत योगदान देणाऱ्या समाज बांधवांचे मोठ्यांना मनाने कटूता न ठेवता सर्वांचे कौतूक केले व आपल्या मराठा बांधवांच्या उत्कर्षासाठी काम करत रहावे यासाठी प्रयत्न करावेत व मनभेद न ठेवता हा वसा जपवा, असे आवाहन केले होते.
त्याचे पश्चात पत्नी व तीन मुलगे, सुना. नातवंडे असा परिवार आहे. त्याचेवर मूळ गावी सडा मिऱ्या रत्नागिरी येथे अंत्यसंस्कार करणेत आले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment