डाऊर नगर शाळेत वातावरण जनजागृती कार्यशाळा

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि. १८ (विठ्ठल ममताबादे ) : बदलत्या वातावरणाचा जनजीवनावर होणारा परिणाम या बाबत भावी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या हेतूने उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद डाऊरनगर शाळेत प्रकृती आणि सी.ए.सी.आर. एन. जी ओ यांच्या सौजन्याने इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे ऑगस्ट 2023 पर्यत चार भाग होतील व शेवटी मुलांची एक उत्तर चाचणी देखील घेतली जाईल अशी माहिती समन्वयक गीता म्हात्रे यांनी दिली.कार्यशाळेच्या पहिल्या भागात श्वेता आधावडे,शितल पटेल,वैष्णवी व-हाडे,यांनी हवामान व ऋतूबदल या विषयी प्रात्यक्षिका सहीत मुलांना माहिती दिली.तसेच मुलांची पूर्व चाचणी घेतली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment