गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस धावणार हाऊसफुल्ल!

Team RatnagiriLive
1 Min Read

३ ऑक्टोबर पर्यंतच्या फेऱ्यांचे प्रतीक्षा यादीवरील आरक्षण सुरू

रत्नागिरी : पुढील महिन्यात 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे  अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी  आणि गेल्याच महिन्यात सुरू झालेली वंदे भरत एक्सप्रेस आत्ताच फुल झाली आहे. गणेशोत्सव कालावधीतील या आलिशान गाडीच्या फेऱ्या हाऊस फुल्ल झाल्या आहेत.

पुढील महिन्यात 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. दिनांक 23 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे. यासाठी वंदे भारत एक्सप्रेसच्या मुंबई मडगाव तसेच मडगाव मुंबई अशा अप आणि डाऊन मिळून दिनांक 3 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या नऊ फेऱ्या आत्ताच फुल झाल्या आहेत. या नऊ फेऱ्यांसाठी सध्या प्रतीक्षा यादीवरील आरक्षण सुरू आहे.

हेही वाचा : Konkan Railway| यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरीपर्यंत प्रथमच धावणार मेमू स्पेशल ट्रेन!

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment