रत्नागिरीत आधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणा लवकरच सुरू होणार

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : मागील काही वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असलेली ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम शहरात सुरू आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावणारी सिग्नल यंत्रणा लवकरच पुन्हा एकदा सुरू झालेली पाहायला मिळणार आहे.

रत्नागिरी शहरात मारुती मंदिर, जेल रोड, शासकीय रुग्णालय, जयस्तंभ, राम नाका, गोखले नाका  तसेच गाडीतळ  या वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक नियमन करणारी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र मागील काही वर्षांपासून ती नादुरुस्त अवस्थेत आहे.

अद्ययावत सिग्नल यंत्रणा

शहरात ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्या ऐवजी आता आधुनिक पद्धतीची यंत्रणा बसवली जात आहे. महानगरातील सिग्नल यंत्रणेप्रमाणे ही सिग्नल यंत्रणा आहे. सध्या जेलरोड येथे नवीन ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित ठिकाणचे काम देखील लवकरच पूर्ण होऊन वाहतूक नियमन करणारी यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment