कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर!!

Team RatnagiriLive
1 Min Read

पोरबंदर-कोचुवेली एक्सप्रेस ला जोडणार जादा डबा

रत्नागिरी : पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत असल्याने काही गाड्यांना अतिरिक्त कोच जोडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वे कडून केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून पोरबंदर- कोचुवेली एक्सप्रेसला देखील अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली या मार्गावर धावणाऱ्या गाडीला (20910) दि. 11 जानेवारी 2024 रोजी सुरू होणाऱ्या प्रवासासाठी तर ही गाडी परतीच्या प्रवासात असताना म्हणजे कोचुवेली ते पोरबंदर दरम्यानच्या प्रवासासाठी (020909) दि. 14 जानेवारी रोजी स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा जोडण्यात येणार आहे. यामुळे प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment