शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्यासह आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज

Team RatnagiriLive
1 Min Read


तिसऱ्या दिवशी २ उमेदवारांची ४ नामनिर्देशन पत्र दाखल


रत्नागिरी, दि. १६ :  नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विनायक भाऊराव राऊत यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एकूण ३ नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच अमृत अनंत तांबडे यांनी अपक्ष १ नामनिर्देशन पत्र दाखल केले. अशी एकूण दोन उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र आज दाखल केली.

दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मंगळवारपर्यंत एकूण तीन उमेदवारांची ५ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment