रत्नागिरीत उभारणार आचार्य ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर स्मृती दालन!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • रत्नागिरीतील पत्रकार भवनला देणार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव

रत्नागिरी : येथील टिळक आळी येथे राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत रत्नागिरी येथे उभारण्यात येणाऱ्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदलना संदर्भात विचार मंथन करण्यात आले.

या प्रसंगी रवींद्र बेडीकीहाळ लिखित “आचार्य बाळशास्त्री जांभेकर : कर्तृत्वाचा एक शोध” हे पुस्तक देऊन मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. तसेच पत्रकार-साहित्यिक संमेलन रत्नागिरी येथे आयोजित व्हावे, यावरही सविस्तर चर्चा झाली.
या महत्त्वपूर्ण बैठकीस ज्येष्ठ संपादक श्री. राजाभाऊ लिमये, श्री. राजीव लिमये, श्री. श्रीकांत भिडे आदी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment