कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हिसार-कोईमतूर एक्सप्रेसला वातानुकलीत जादा डबा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हिसार ते कोईमतूर या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडीला वातानुकूलित थ्री टायर श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार हिसार ते कोईमतुर (222475) या मार्गावर धावताना दिनांक 1 मे ते 29 मे 2024 या कालावधीसाठी तर कोईमतुर ते हिसार (22476) या मार्गावर धावताना दिनांक 4 मे ते 1 जून 2024 या कालावधीसाठी थ्री टायर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी होऊ लागल्यामुळे रेल्वेने काही नियमित तसेच ज्यादा गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यानुसार कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून एकदा धावणाऱ्या हिसार ते कोईमतुर या गाडीला देखील एक वातानुकूलित डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment