कोकण रेल्वे मार्गावर १४ मे रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक

Team RatnagiriLive
1 Min Read
  • सोमवारची मुंबई- मंगळूरु एक्सप्रेस धावणार दीड तास उशिराने !

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू दरम्यान दररोज धावणारी सुपरफास्ट गाडी मंगळवार दि. १४ मे २०२४रोजी कोकण रेल्वे मार्गावर धावत असताना दीड तास विलंबाने धावणार आहे. दिनांक 14 मे रोजी कोकण रेल्वे मार्गावर उडूपी ते सुरतकल दरम्यान घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे या गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून १५ मिनिटांपर्यंत असा सुमारे अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मेगा ब्लॉकमुळे दिनांक 13 मे 2024 रोजी मुंबईतून मंगळूरू जंक्शन साठी सुटलेली दैनंदिन सुपरफास्ट गाडी (12133) मडगाव आणि उडुपी दरम्यान एक तास 30 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment