तेलंगणातील तायक्वांदो स्पर्धेसाठी लांजातील राष्ट्रीय पंच तेजस्विनी आचरेकर यांची निवड

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा : लांजा येथील राष्ट्रीय पंच तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर यांची तेलंगणा या राज्यात होणाऱ्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे.

तेजस्विनी आचरेकर यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तेजस्विनी या लांजा येथील तायक्वांदो फिटनेस अकॅडमीच्या प्रमुख आहेत. आचरेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तायक्वांदो या प्रकारात यशस्वी झाले आहेत. विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये लांजा येथील खेळाडू सहभागी झाले आहेत.

तेजस्विनी यांनी कराटे तायक्वांदो यामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तेलंगणा येथे दिनांक 27 आणि 28 जुलै रोजी ही राज्यस्तरीय स्पर्धा तेलंगणा येथेसंपन्न होत आहे. लांजा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सिराज नेवरेकर यांनी तेजस्विनी आचरेकर यांचे अभिनंदन केले आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment