रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे बाबासाहेबांच्या मूळ गावी प्रथमच मानवंदना

Team RatnagiriLive
1 Min Read

मंडणगड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे प्रथमच त्यांच्या मूळ गावी, मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे (भा. पो. से.) तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा. पो. से.) यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याचवेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा. पो. से.) यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांकरिता आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment