नाचणे येथील समर कॅम्पला उदंड प्रतिसाद

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : नाचणे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं १ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.दीडशेहून अधिक मुलांनी सहभाग घेतला.
फिटनेस मंत्रा रत्नागिरी यांनी झुंबा सादर केला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर यांनी मुलांना अर्क चित्रे काढून दाखविली. बालगीते, साक्षी कोतवडेकर यांनी आजी आजोबा यांच्य गोष्टी सांगितल्या.तर विनय उपरकर यांनी जादुई दुनियेची सफर घडवून आणली.

नम्रता चौगुले यांनी मुलांना कागदापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करून दाखविल्या.समर कॅम्प ओम साई मित्र मंडळ नाचणे येथे दोन दिवस चालणार आहे. समर कॅम्पचे हे यशस्वी चौथे वर्ष आहे. नाचणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विनामूल्य समर कॅप चे आयोजन करण्यात येते.
यावेळी सरपंच ऋषिकेश भोंगले, उपसरपंच नीलेखा नाईक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, गणेश चव्हाण, शुभम सावंत, प्रशांत रसाळ, दीपक नागवेकर, शरदिनी मुळ्ये, ग्रामविकास अधिकारी खरंबले, संतोष ढोले, अश्विनी पाटील, सदस्य मुरुळकर, सौ. घडशी आदी उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment