वैदेही रानडे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओ

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या जागी वैदेही रानडे (भा. प्र. से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्या एमएसआरडीसी मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होत्या.

काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची धाराशिव येथे जिल्हाधिकारी पदावर बढती होऊन बदली झाली आहे. रत्नागिरी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदलीनंतर या पदाचा वारसदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर गुरुवारी आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेला श्रीमती वैदेही रानडे यांच्या रूपाने जिल्हा परिषदेला नव्या सीईओ मिळाल्या आहेत.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment