Konkan Railway | मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये महिलेच्या ३ लाखांच्या दागिन्यांवर चोराचा डल्ला!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या २ लाख ८९ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. ५ जुलै रोजी मध्यरात्री २.३० च्या सुमारास येथील रेल्वेस्थानकात ही घटना घडली.

या संदर्भातील अधिक माहितीनुसार एक महिला १२६२० क्रमांकाच्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या कोच नं. ५३ मधील ६० नंबरच्या आसनावरून रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करत होती. एक्स्प्रेस खेड येथील रेल्वेस्थानकात आली असता चोरट्याने त्या झोपल्या असल्याची संधी साधत सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केली. बॅगेतील दागिने व रक्कम काढून घेत बॅग रेल्वे डब्यातील टॉयलेटमध्ये फेकत पलायन केले.

दरम्यान, सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीस गेल्याचे महिलेच्या लक्षात येताच तिला धक्का बसला. नंतर खेड येथील पोलीस ठाणे गाठत तिने रितसर तक्रार नोंदवली.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment