२७ व्या राज्यस्तरीय कॅप्टन ईझिकल मेमोरियल शूटिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या पूजा चौहानला सुवर्णपदक

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरावरील कॅप्टन ईझिकल मेमोरियल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चिपळूण येथील पूजा किसनसिंग चौहान हिने महिलांच्या ५० मीटर रायफल प्रकारातील महिलांच्या सिनियर गटात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले आहे.

मुंबईतील वरळी येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशन येथे नवशिक्या शूटर्ससाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रत्नदुर्ग पिस्टल अँड रायफल शूटिंग क्लब ऑफ रत्नागिरीची सभासद असलेली पूजा चौहान ही देखील सहभागी झाली होती. पूजा ही चिपळूण येथील आहे. तिने आपल्या गटातून वैयक्तिक प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावत नवशिक्यांसाठी आयोजित या स्पर्धेत बाजी मारली.

महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अशोक पंडित तसेच सचिव शीला कानूंगो यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले. पूजाला आहे हे यश प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षक कौस्तुभ सुर्वे यांचे मार्गदर्शन लागले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment