अंगणवाडीसाठी भरती प्रक्रिया
सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील व्हेळ व खेरवसे या गावामध्ये मिनी अंगणवाडी सेविका तर भांबेड, गवाणे, वाकेड, रिंगणे, वेरवली खुर्द, कोंडये, व्हेळ, इसवली-पनोरे, देवधे, प्रभावनवल्ली, जावडे, वाघणगांव या गावामध्ये अंगणवाडी मदतनीस पदे भरावयाची आहेत.
इच्छुक उमेदवारांनी यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणून एच. एस. सी, डि. एड./बीएड/पदवी असल्यास गुणपत्रक जोडावे. मागासवर्गीय उमेदवारांनी जातीचा दाखला तसेच रहिवासी दाखला, विधवा / अनाथ असल्यास विहित प्रमाणपत्र जोडावे. अंगणवाडी सेविका / मदतनीस म्हणुन दोन वर्षाचा अनुभव असल्यास शासकीय कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. संबंधितांनी आपले अर्ज 5 ते 16 जून 2023 या कालावधीत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावे, असे बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) एकात्मिक बाल विकास सेवा योजना, लांजा यांनी कळविले आहे.