महाराष्ट्र

गुढीपाडव्यानिमित्त वुमेन ऑफ विसडमतर्फे २२ रोजी उरणमध्ये बाईक रॅली

उरण दि.१९ (विठ्ठल ममताबादे ) : हिंदू नववर्ष अर्थातच गुढीपाडवा. या हिंदू नववर्षाचे स्वागत उरण मध्ये विविध उपक्रम साजरे करून होत असून दि.22 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 वा. वूमेन ऑफ विसडम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण शहरातील पेन्शनर्स पार्क येथून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

नववर्षाचे स्वागत बाईक रॅलीने होणार असून सामाजिक कार्यकर्त्या सारिका पाटील यांच्या पुढाकाराने बाईक रॅली आयोजित करण्यात आले असून सामाजिक कार्यकर्त्या संगीता प्रशांत पाटील या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आहेत.सदर बाईक रॅली फक्त महिलांसाठीच असून या बाईक रॅलीत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. इच्छुक महिलांनी खालील नंबर वर नाव नोंदणी करावी
सारिका सागर पाटील -9664979696.

प्रतिकात्मक छायाचित्र

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button