लग्नाचे करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार

Team RatnagiriLive
1 Min Read
  • संशयित प्रौढाची रवानगी पोलीस कोठडीत

रत्नागिरी : आपल्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखऊन विविध ठिकाणी नेत दीड वर्ष लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात एका ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

गोविंद अनंत घवाळी (४५, रा. भारती शिपयार्डजवळ मिर्‍या बंदर, रत्नागिरी) असे या अत्याचार प्रकरणात पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात संबंधित तरुणीने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार संशयित गोविंद घवाळी याने पीडितेशी ओळख निमार्ण करुन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तुझ्याशी लग्न करीन लग्न करीन असे आमिष दाखवून त्याने ऑगस्ट 2023 ते 6 डिसेंबर 2024 या कालावधीत तिच्याशी जबरदस्तीने शहरातील मांडवी, टीआरपी, गोडबोले स्टॉप, पंधरा माड, मिर्‍या बंदर, परटवणे या ठिकाणी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित तरुणीने गोंविदला नकार दिला किंवा कोणाशीही बोलली तर तिला वारंवार शिविगाळ व मारहाणही केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या बाबत पीडितेने सोमवार 9 डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी गोविंद घवाळी याला रात्री 10.43 वा. सुमारास अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment