रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

पुणे-रत्नागिरी समर स्पेशल गाडी आज रात्री सुटणार !

रत्नागिरी : उन्हाळी सुट्टीच्या हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल गाड्या या प्रचंड गर्दीसह धावत आहेत. मध्य रेल्वेने जाहीर केलेली रत्नागिरी – पनवेल अनारक्षित साप्ताहिक स्पेशलची दुसरी फेरी आज ११ मे रोजी होणार आहे. रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी ही गाडी रत्नागिरी साठी सुटणार आहे.


०११३१/०११३२ क्रमांकाची पुणे- रत्नागिरी अनारक्षित साप्ताहिक स्पेशल दर गुरुवारी धावणार आहे. ११ , १८ , २५ मे रोजी धावणारी स्पेशल पुणे येथून रात्री ८.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता रत्नागिरी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात दर शनिवारी १३ , २० , २७ मे रोजी धावणारी स्पेशल रत्नागिरी येथून दुपारी १ वाजता सुटून त्यादिवशी रात्री ११.५५ वाजता पुणे येथे पोहोचेल. २२ डब्यांची स्पेशल लोणावळा , कल्याण , रोहा , माणगाव , वीर , खेड , चिपळूण , सावर्डे , आरवली , संगमेश्वर आदी स्थानकात थांबेल.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button