ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले ; काजळी नदीच्या पुराचा मंदिराला वेढा

लांजा:- लांजा तालुक्याला रविवारी मुसळधार पावसाने जोरदार झोडपले. लांजा दाभोळे रस्त्यावर आसगे येथे पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून तर दुसरीकडे निवसर येथे गोठ्यावर झाड कोसळून चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे  काजळी नावेरी मुचकुंदी नद्यांना पूर आला असून नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत बेर्डे वाडी आणि खोरनिननको धरण क्षेत्रात कोणताही धोका नाही. तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीला पूर आल्यानेआंजनणारी येथील दत्त मंदिराला पोराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

काजळी नदीला पूर आल्याने आंजणारी येथील दत्त मंदिर पाण्यांत बुडाले आहेm

तालुक्यातील निवसर येथे सकाळी लक्ष्मी भिकाजी शिंदे यांच्या जनावरांच्या गोठ्यावर झाड पडून नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत त्यांचे अंदाज 37810/-  रुपये झाले आहे. आज दिवसभर पावसाचे जोरदार बरसणे सुरू होते. पावसाची संततधार सुरु असल्याने लांजा शहरासह तालुक्यातील नदीनाले दुधडी भरून वाहत होते. लांजा शहरात लांजा शहरात वैभव वसाहत येथील रस्त्यावर पाणी आले होते.

लांजा आसगे दाभोळे राज्यमार्गावर राज्यमार्गावर आसगे येथे पुलावरून पाणी गेल्याने दोन्ही बाजूंची  वाहतूक ठप्प होती

गोठ्याच्या इमारतीवर झाड कोसळल्याने झालेले नुकसान.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button